Monday, December 29, 2008

लोभ असावा

पाच सहा महीने झाले ब्लॉग्गिंग च्या विश्वात आलो आणि या विश्वाची व्याप्ति पाहून थक्क झालो .माझ्या व्यंगचित्रांना तथाकथित मिडिया मधे शोधून शोधून थकलो असतो तरी एखादा कोपरा देखिल मिळाला नसता, पण आज ती माझ्या ब्लॉग वर दिमाखात मिरवत आहेत .आणि आपल्या सारख्या असंख्य -वाचकांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. अल्पावधीतच माझ्या ब्लॉग ला उदंड प्रतिसाद लाभला. "मराठी ब्लॉग विश्व" चे विशेष आभार. वर्षाच्या शेवटी मागे पहाताना काहीतरी चांगले नवीन वर्षात देता यावे यासाठी हुरूप आलाय .

वर्ष खूपच क्लेशदायक होतं ! कुठलाही संवेदनशील माणूस आज सेलिब्रेशन च्या मूड मधे नाही. बाकी ज्याना "बहाणा" लागतो त्यांच्या साठी आणखी एक ईयर एंड .

आपल्या वरचे दहशतवादाचे आणि आर्थिक संकट लवकरात लवकर टळो हीच इश्वर चरनी प्रार्थना ! Happy New Year...

लोभ असावा

आपला,

मीनानाथ धसके

Wednesday, December 24, 2008

यांना कुणीतरी थांबवा !

अचुथानंदन, नक्वी आणि आता अंतुले...... लोकक्षोभाला कारणीभूत ठरणारी वक्तव्ये राजकारणी मुंबई च्या दहशतवादी हल्ल्या संबंधात करत आहेत. घराला आग लागली आहे पण यांना आपली पोळी भाजून घ्यायची आहे .मुंबई च्या दहशतवादी हल्ल्याच्या जखमा अजून ओल्याच आहेत तोपर्यंत त्याचा वापर सोयीस्कर रीत्या राजकारणी करत आहेत याहून आपले दुर्दैव ते काय ?
अन्तुलेंनी आता कोलांटी उडी मारली आहे पण त्यांच्या वक्तव्याने जी मने दुखावली गेली आहेत त्याचे काय ? आधीच हताश झालेल्या पोलीस दलाच्या मानसिकतेचे काय ? देशाच्या सुरक्षा व्यवस्थे बद्दल असलेल्या लोकप्रतिनिधिंच्या संकल्पनांचे काय ? किती दिवस आपण हे "चलता है " म्हणत पुढे जाणार ?

Monday, December 22, 2008

आता पाकला धडा शिकवलाच पाहिजे ....

दहशतवादाचा केंद्रबिंदु पाकिस्तान आहे हे आता पुन्हा पुन्हा सिद्ध करायची गरज नाही. पाकिस्तानच्या त्याच त्या टेप ऐकून एव्हाना सगळे जग बोर झाले असेल तरी पाकिस्तानी राजकारणी हा खेल थांबवायला तयार नाहीत. कारण त्यांचा बोलविता धनी कुणी दुसराच आहे .कमीत कमी शरीफ यांनी मान्य तरी केले की दहशतवादी पकिस्तानीच होते.

अमेरिकेवर जेंव्हा हल्ला झाला तेंव्हा त्यानी कुणाला विचारले ? तालीबान राजवट नष्ट करुन टाकली. आता भारतानेच पुढाकार घेवून हा प्रश्न सोडवला पाहिजे कारण सगळ्यात जास्त नुकसान भारताचे होत आहे. प्रत्येक भारतीयाला यापेक्ष्य दुसरे काही या घडीला तरी सूचने शक्य नाही. हे संकट आर्थिक संकटा पेक्ष्या मोठे आहे तेंव्हा एकदाचा प्रश्न सोडवून टाकूया .

Saturday, December 6, 2008

"कोंडी" ने केली पाकिस्तानची कोंडी : कार्टून ऑफ़ द डे

पाकिस्तान कडून पहिल्यापसुनाच अपेक्षा नव्हत्या. तसेच अमेरिका देखिल त्यांच्या फायद्यासाठी कोणती भूमिका घेईल याचा नेम नव्हता .अपेक्षेप्रमाने मुंबई मधे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामधे पाकिस्तान सरकार ने "हात" वर केलेच, पण या हल्ल्यामधे फॉरेनर्स ना टारगेट केल्यामुले अमेरिका देखिल खडबडून जगी झाली आहे. अमेरिकेच्या दबावामुळे पाकिस्तान आता चांगलेच भोवर्यात सापडले आहे .आणि निर्र्लज्य पणे आमचा काहीही सम्बन्ध नाही असे बोलनार्या पाकिस्तान ने आता "ते दहशतवादी आमचेच " असे सूर आळवायला सुरवात केली आहे.

US Secretary of State Condoleezza Rice after visiting India, went to Pakistan and asked Pakistan to hand over the suspects. In Initial responce to India's demands, pakistan had not responded properly and even ruled out the links of terrorist attack to Pakistan. May be Pakistan Govt always faces pressure from extremist and ISI so they cannot openly accept all this. But now International pressure is making Pakistan to take action against Terrorist Camps.

Thursday, December 4, 2008

तर कुत्रा देखिल.......

आपल्याकडेच मतांची भीक मागून खुर्चीवर बसलेल्यांच्या लेखी एका शहीदाच्या घरच्यांची ही किंमत, मग आपल्या सारख्या सामान्यांचे काय ? संदीप उन्नीकृष्णन हजारोलोकांचे प्राण वाचावान्यसाथीj अतिरेक्यांच्या गोल्याना समोर गेला आणि हे तथाकथित लोकाभिमुख पक्षांचे मुख्यमंत्री झेड सिक्यूरिटी च्या आडून अशी बेताल वक्तव्ये करतात.

अचुथानंदन यानी अखेर माफ़ी मागीतली पण त्यांच्यासाराख्या राजकरान्यानी आपल्याला अंतर्मुख करायला लावले. आपण कुणाच्या हातात सत्ता देतो ? आपण मतदान करताना या गोष्टीचा विचार करतो का ?
मुंबई करांच्या जखमा अजून ओल्या आहेत तोपर्यन्ताच राजकारान्यानी आपल्या बेताल वक्तव्याने त्या जखमेवर मीठ चोलले, गेटवे ऑफ़ इंडिया वर आलेल्या जनसागराने हे सिद्ध केले आहे की, आता पुरे जाले. आता बदल हवा.

आपण असेच अविचाराने मतदान करत राहिलो ...... तर कुत्रा देखिल खुर्चीवर बसेल ......