Monday, December 29, 2008

लोभ असावा

पाच सहा महीने झाले ब्लॉग्गिंग च्या विश्वात आलो आणि या विश्वाची व्याप्ति पाहून थक्क झालो .माझ्या व्यंगचित्रांना तथाकथित मिडिया मधे शोधून शोधून थकलो असतो तरी एखादा कोपरा देखिल मिळाला नसता, पण आज ती माझ्या ब्लॉग वर दिमाखात मिरवत आहेत .आणि आपल्या सारख्या असंख्य -वाचकांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. अल्पावधीतच माझ्या ब्लॉग ला उदंड प्रतिसाद लाभला. "मराठी ब्लॉग विश्व" चे विशेष आभार. वर्षाच्या शेवटी मागे पहाताना काहीतरी चांगले नवीन वर्षात देता यावे यासाठी हुरूप आलाय .

वर्ष खूपच क्लेशदायक होतं ! कुठलाही संवेदनशील माणूस आज सेलिब्रेशन च्या मूड मधे नाही. बाकी ज्याना "बहाणा" लागतो त्यांच्या साठी आणखी एक ईयर एंड .

आपल्या वरचे दहशतवादाचे आणि आर्थिक संकट लवकरात लवकर टळो हीच इश्वर चरनी प्रार्थना ! Happy New Year...

लोभ असावा

आपला,

मीनानाथ धसके