अचुथानंदन, नक्वी आणि आता अंतुले...... लोकक्षोभाला कारणीभूत ठरणारी वक्तव्ये राजकारणी मुंबई च्या दहशतवादी हल्ल्या संबंधात करत आहेत. घराला आग लागली आहे पण यांना आपली पोळी भाजून घ्यायची आहे .मुंबई च्या दहशतवादी हल्ल्याच्या जखमा अजून ओल्याच आहेत तोपर्यंत त्याचा वापर सोयीस्कर रीत्या राजकारणी करत आहेत याहून आपले दुर्दैव ते काय ?
अन्तुलेंनी आता कोलांटी उडी मारली आहे पण त्यांच्या वक्तव्याने जी मने दुखावली गेली आहेत त्याचे काय ? आधीच हताश झालेल्या पोलीस दलाच्या मानसिकतेचे काय ? देशाच्या सुरक्षा व्यवस्थे बद्दल असलेल्या लोकप्रतिनिधिंच्या संकल्पनांचे काय ? किती दिवस आपण हे "चलता है " म्हणत पुढे जाणार ?