Monday, November 1, 2010

Out Sourcing

मित्रहो...
कांचन च्या विनंती वरून  "मोगरा फ़ुलला" दिवाळी अंकासाठी एक व्यंगचित्र बनवले होते. तेव्हा माहीतच नव्हते ओबामा पण येणार आहेत ते. आता ते व्यंगचित्र  योग्य वेळी केल्यासारखे झाले आहे... तुम्ही बघाच.
व्यंगचित्र

ता.क. - अंक व्यंगचित्रहूनही जास्त छान आहे...तो देखिल बघा.

Wednesday, October 27, 2010

CAN WE HELP KRISHNAN WIN ?????

Dear All,

If you have  not heard of Narayanan Krishnan,  it is a  collective failure.
This is one of the most incredible stories of personal commitment.

Narayanan Krishnan, all of 29 years old now, does what he was professionally trained to do as a chef,  Feed people.
Only Krishnan does not do this in the swanky confines of a 5-star hotel.
Every day, he wakes up at 4 am, cooks a simple hot meal and then, along with his team, loads it in a van and travels about 200 km feeding the homeless in Madurai, Tamil Nadu.

Krishnan feeds, often with his hands, almost 400 destitute people every day.
And for those who need it, he provides a free haircut too.

According to CNN, eight years ago, this award-winning chef with a five-star hotel chain was all set to go to Switzerland for a high-profile posting.
 On a visit to a Madurai temple, he came across a homeless, old man eating his own human waste. That stark sight changed Krishnan's life.

Much to the dismay of his parents, CNN says, Krishnan abandoned his career plans and decided to spend his life and his professional training in looking after those who could not care for themselves. He has provided more than 1.2 million hot meals through his nonprofit organization  Akshaya Trust, and now  hope  to extend this to shelter for the homeless too.

*Krishnan is the only Indian in a list of 10 heroes that CNN has picked worldwide to honour*. One of them will be chosen CNN Hero of the Year,selected by the public through an online poll. If many Indians get together to vote for this inspiring man, he can win by a long mile.

If Krishnan wins he will get $100,000 in addition to the $25,000 that he gets for being short listed for the Top 10. Akshaya Trust needs all the monetary support it can get to build on Krishnan's dream.
Let's help him get  there.

Vote for Krishnan here.  http://heroes.cnn.com/vote.aspx
The poll continues  through November 18 at 6 a.m. ET.



Read more at:
http://www.ndtv.com/article/catch%20of%20the%20day/catch-he-brings-hot-meals-to-india-s-homeless-61029?cp

Friday, October 22, 2010

दीपज्योती

मित्रानो , दीपज्योती प्रकाशित झाला. Due to heath reasons, I could not draw more cartoons eventhough lot of concepts were ready. Hope you will enjoy this one. The link is दीपज्योती
Wish all of you a very happy and healthy Diwali.

-Minanath

Saturday, September 18, 2010

धुमसते काश्मिर

काश्मिर मधली जाळ्पोळ थांबायचे नाव घेत नाही आणि पाकिस्तान ला त्यामधे आपली पोळी भाजून घ्यायची आहे. "मानवाधिकारांचे उल्लंघन थांबवा" म्हणून पकिस्तानचे विदेशमंत्री कुरेशी यांनी सल्ला दिला. एवढी वर्षे घुसखोरी आणि आतंकवादी कारवाया होत आहेत, तेन्व्हा हे शहाणपण फ़क्त  भारताला सल्ले देण्यापुरतेच मर्यादित आहे का ?

Sunday, September 5, 2010

ब्लॉगर्स साठी....

सकाळ ने ब्लॉगर्सना कॉपीराइट मार्गदर्शन करण्यासाठी एक व्हिडिओ कॉन्फ़रन्स आयोजित केली होती. आपल्या हक्कांबद्दल जाणून घेण्यासाठी इ-सकाळ वर सविस्तर वाचा.
दुवा... http://www.esakal.com/esakal/20100904/5643604780719295296.htm

फोटो सौजन्य : सकाळ

Sunday, August 8, 2010

कॉमन वेल्थ ****

दीड दोन वर्षापूर्वी मी एक वाघाचे व्यंगचित्र काढले होते. ते एवढे प्रसिद्ध झाले की मलाच एकदा ते फ़ॉरवर्डेड मेल मधे आले. राष्ट्रकूल स्पर्धेचा खिन्न "शेरा" बघितला आणि मला त्या वाघाची आठवण झाली. मग हे व्यंगचित्र सुचले. या भ्रष्ट्राचाराबद्दल एवढ्या लोकांनी एवढे बोलून झाले आहे की न बोलता सरळ ब्रश हाती घेतलेला बरा.

 

Friday, July 9, 2010

खळ निंदका मनीहि सत्य न्याय वसू दे ।

भाजपच्या गडकरींनी यादवांची खिल्ली उडवून आधीच त्यांच्या अशा टीका प्रकारावर नाराजी ओढवून घेतली होती. आता ते परत बरसले. या वेळेला त्यानी अफ़झल गुरु ला कॉंग्रेस चा जावईच बनवून टाकले. त्यांची त्यामगची भावना समजून घेतील तर ते राजकारणी कसले? असो. मूक प्राण्यांना यावेळी घाणेरड्या राजकारणात ओढले नाही हा मुद्दा महत्वाचा आणि त्यावरच हे व्यंगचित्र.

Wednesday, June 16, 2010

दोन देश....

एका देशामधे  मेक्सिको आखातातील ’बीपी’ ची तेलगळती एवढ्या गांभिर्याने घेतली जाते... तर दुसरीकडे एका देशात हजारो बळी घेणार्या भोपाळ वायू गळती दुर्घटनेच्या बाबतीत अनेक वर्षे सरकार दिशाहीन आहे.  ओबामांनी बीपीला धारेवर धरले आहे. आणि इथे अ‍ॅंडरसन ला मोकट सोडून दिले.

Sunday, March 28, 2010

बिग बी, बिगर पॉलिटिक्स, बिग्गेस्ट प्रॉब्लेम्स...

अमिताभ बच्चन यांच्या एका कार्यक्रमातील उपस्थितीने एवढी प्रश्नचिन्हे ? एवढी की कॉंग्रेसजन आजकाल सगळ्या "बच्चन" कुटुंबीयांना चक्क टाळू लागलेत ? पुण्याच्या सहित्य संमेलना ला आधीच उपस्थिती लावून मुख्यमंत्र्यांनी देखिल बिग बी ला खो दिला.


Thursday, March 25, 2010

चीन मधे गूगलींग ला घरघर.....!!

चीन मधे "गूगल" ने सेन्सॉरशिप चे जोखड झुगारून सर्च इंजिन हॉंन्गकॉन्ग ला जोडले. पण यामुळे चीन मधिल  लोकांना काही फायदा होण्याऐवजी गूगल च्या भवितव्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गूगल चे चीन सारख्या मोठ्या इंटरनेट कम्युनिटीला "बाय बाय" करण्यामागे निश्चितच काहीतरी कारण असेल. असो. हे व्यंगचित्र पहा त्यावरच.

Sunday, March 21, 2010

"माला"वतींची "माया" आणि फ़सलेल्या मधमाशा

मायावतींच्या नोटांच्या हाराने गाजलेल्या सभेत मधमश्यांचा हल्ला झाला त्याचे खापर अपेक्षेप्रमाणे मायावतींनी विरोधकांवर फ़ोडले. मधमाश्या आल्या आणि काही वेळाने कुणालाही इजा न करता गेल्या देखिल. मधमाश्या कशा आल्या याची उच्चस्तरीय पोलिस चौकशी चालू आहे. पण त्या काहीही न करता का गेल्या हे माहिती आहे का ?

Tuesday, March 9, 2010

उदो उदो

अखेर राज्यसभेत महिला आरक्षण विधेयक मंजूर झालं ! दलित आणि मुस्लीम कल्याणाच्या बुरख्याआड लपलेल्या पुरुष प्रधान "यादवां"ना इतर सर्व पक्षांनी हिसका दाखवला. याचे श्रेय सोनिया गांधींचे की सर्वांचे याचा विचार करण्यापेक्षा स्त्री शक्तीच्या या विजयाचे आणि पुरोगामी भारतीयांचे अभिनंदन करायला हवे. यावर हे भाष्य -

Sunday, February 28, 2010

महागाईच्या आगीत "तेल"

प्रणवदांनी अतिशय सफ़ाइदारपणे एका खिशात पैसे टाकले आणि अप्रत्यक्ष्यरीत्या इंधन दरवाढ करून केन्हा काढून घेतले ते समजले देखिल नाही. सेन्सेक्स ने जरी या बजेट ला सलाम दिला असला तरी हा देश शेतकरी, कष्टकरी आणि सामन्य नोकरदारांचा आहे हे राज्यक्र्त्यांना विसरून चालणार नाही.

Wednesday, February 24, 2010

हास्यगाऽऽरवा

मित्रहो,
होळी अंक  हास्यगाऽऽरवा आज प्रकाशित झाला. "हास्य" रंगाची मुक्त उधळ्ण करणारा हा साहित्य मेवा आपले जीवन देखिल हास्यमय करो हीच सदिच्छा.
Link - हास्यगाऽऽरवा

ता.क. : त्या निमित्ताने सर्व साहित्यिकांचे अभिनंदन.

Sunday, February 21, 2010

"अंत्योदय" की उत्तरोदय ?

भाजपची सूत्रे घेतल्यानंतर नितीन गडकरींकडून काही "वेगळे"पणाची अपेक्षा होती. त्यांनी तसा प्रयत्न केलाही. तंबू मधे राहणे वगैरे, सामाजिक आणि भौगोलिक "बेस" वाढवण्यासाठीच्या बाकी प्रयत्नांना "आतून" किती प्रतिसाद आहे महिती नाही. दलितांना अचानक "अजेंड्या"वर घेण्यामगे उत्तर प्रदेश काबीज करण्याची दूरद्रुष्टी दिसते ( राहुल गांधींचा हेतू देखिल- सूज्ञास सांगणे नलगे).पण त्यामुळे ही "Party with Difference" पुढे "Party with Differences" बनायला नको. गडकरींच्या या योजनेस शुभेच्छा.

Sunday, February 7, 2010

काटेरी बीटी वांगे

वांग्याची भाजी कुणाला आवडत नाही? पण पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांना वांग्याची भाजी अजिबात गोड लागत नसणार... कारण बीटी वांग्याने त्यांना दिलेला त्रास. वांग्याच्या भाजीबरोबर हे व्यंगचित्र देखिल एन्जोय करा...

Monday, January 25, 2010

IPL - इंडीयां पाकीस्तान लड़ाई

IPL लीलावा मधे झालेला पोरकटपना पाकीस्तान ने सीरीयसली घेतला आहे आणी त्याला राजकीय प्रतीक्रिया दीली आहे .वस्तुत: IPL मधे सरकारचा सहभाग आणी प्रभाव कीती हे मागच्या खेपेस दीसून आले आहे ( मागच्या वेळी IPLलाच सरकार ने हद्दपार केले होते ) .तरी देखिल पाकीस्तान च्या राजकारन्यानी अशी प्रतीक्रिया द्यावी हे नवलच .असो .सदोदीत तनावपूर्ण संबध असलेल्या आपल्या शेजार्याच्या यादीत आणखी एक वादाची भर पडली यावर एक व्यंगचित्र ( कृपया डाउनलोड करून पहावे. व्यंगचित्र थोड़े मोठे आहे )

Saturday, January 23, 2010

अॉस्ट्रेलीया मधल्या भारतीयांचे काय होणार ?

अॉस्ट्रेलीया मधल्या भारतीयांचे काय होणार कोणास ठावूक तीथले राज्यकर्ते फक्त खेद व्यक्त करतात आणी आपले राज्यकर्ते हात वर करतात पंतप्रधानांचे या वीषयावरील मौन चींताजनक आहे ... यावर एक व्यंगचित्र

Wednesday, January 13, 2010

Wise Men Think Alike

मित्रहो,
झेंडा चित्रपटसंबंधी एक व्यंगचित्र आम्ही १० जानेवारी २०१० ला आमच्या ब्लॉग वर प्रसिद्ध केले होते.
ही त्याची लिंक http://minanath.blogspot.com/2010/01/blog-post_10.html


आम्ही वृत्तपत्रे चाळत असताना आमच्या हाती लोकसत्ता चे ११ जानेवारी २०१० चे याच सम्बंधाताले व्यंगचित्र लागले .
खालील लिंक वर ११ जानेवारी २०१० चे व्यंगचित्र पहा -
http://www.loksatta.com/index.php?option=com_phocagallery&view=category&id=33:2009-12-31-11-54-56&Itemid=83

Tuesday, January 12, 2010

भारतीया वरील हल्ले

आँस्ट्रेलीया मधे भारतीयावारील हल्ले दीवसेंदीवस वाढतच आहेत हे हल्ले वंशवादाने प्रेरीत आहेत की त्यांची कायदा व्यवस्था एवढी ढासळली आहे या पेक्ष्या तेथील भारतीया मधील भय दूर करने जास्त महत्वाचे आहे आज ते ज्या दडपनाखाली जगत आहेत ते दुर्लक्षीत करून चालणार नाही यावर भाष्य करणारे हे एक कार्टून

Monday, January 11, 2010

Aal izz Well

'थ्री पॉइंट समवन' आणि ' ३ इडियट्स' चा वादावर जरी पडदा पडला असला तरी त्याचा खरा फायदा चेतन भगत ला झालेला दिसतो. या वादाच्या दरम्यान त्याच्या या पुस्तकाचा खप वाढला आणि ते आउट ऑफ़ स्टॉक झाले होते. खरे इडियट्स कोण आहेत ते आता तुम्हीच ठरवा.
पहा यावर एक छान व्यंगचित्र http://caricaturehome.blogspot.com/2010/01/aal-izz-well.html

Sunday, January 10, 2010

झेंडा ला राजकीय कात्री

आजकाल मराठी चित्रपटांना आणखी एक नवीन सेंसाॅरचालू झाला आहे - "पॉलिटिकल सेंसाॅर ". झेंडा चा वाद मिटायच्या आधीच 'शिक्षणाच्या आयचा घो' चा वाद सुरु झाला . काही दिवसानी राजकारण्याना विचारूनच चित्रपट निर्मिती करण्याची वेळ येवू नए म्हणजे झाले. अभिव्यक्ति स्वातंत्र्या वरील या राजकीय आक्रमणाचा आपण निषेध करुया .

Sunday, January 3, 2010

३ पेक्षा जास्त इडियट्स

आजकाल बॉलीवुड मधे नवीन चित्रपट हिट होण्याच्या मार्गावर असेल तर त्याबद्दल बरीच प्रकरणे बाहेर येणे नवीन नाही ( पब्लिसिटी स्टंट ). " इडियट्स" आणि चेतन भगत यांची कादंबरी " पॉइंट समवन" याच्या बाबतीत देखिल सध्या हेच चालू आहे. श्रेय लाटण्यावरून सुरु झालेली सुन्दोपसुन्दी सगळयानी पाहिली आहे. यावर एक व्यंगचित्र