Sunday, February 28, 2010

महागाईच्या आगीत "तेल"

प्रणवदांनी अतिशय सफ़ाइदारपणे एका खिशात पैसे टाकले आणि अप्रत्यक्ष्यरीत्या इंधन दरवाढ करून केन्हा काढून घेतले ते समजले देखिल नाही. सेन्सेक्स ने जरी या बजेट ला सलाम दिला असला तरी हा देश शेतकरी, कष्टकरी आणि सामन्य नोकरदारांचा आहे हे राज्यक्र्त्यांना विसरून चालणार नाही.

Wednesday, February 24, 2010

हास्यगाऽऽरवा

मित्रहो,
होळी अंक  हास्यगाऽऽरवा आज प्रकाशित झाला. "हास्य" रंगाची मुक्त उधळ्ण करणारा हा साहित्य मेवा आपले जीवन देखिल हास्यमय करो हीच सदिच्छा.
Link - हास्यगाऽऽरवा

ता.क. : त्या निमित्ताने सर्व साहित्यिकांचे अभिनंदन.

Sunday, February 21, 2010

"अंत्योदय" की उत्तरोदय ?

भाजपची सूत्रे घेतल्यानंतर नितीन गडकरींकडून काही "वेगळे"पणाची अपेक्षा होती. त्यांनी तसा प्रयत्न केलाही. तंबू मधे राहणे वगैरे, सामाजिक आणि भौगोलिक "बेस" वाढवण्यासाठीच्या बाकी प्रयत्नांना "आतून" किती प्रतिसाद आहे महिती नाही. दलितांना अचानक "अजेंड्या"वर घेण्यामगे उत्तर प्रदेश काबीज करण्याची दूरद्रुष्टी दिसते ( राहुल गांधींचा हेतू देखिल- सूज्ञास सांगणे नलगे).पण त्यामुळे ही "Party with Difference" पुढे "Party with Differences" बनायला नको. गडकरींच्या या योजनेस शुभेच्छा.

Sunday, February 7, 2010

काटेरी बीटी वांगे

वांग्याची भाजी कुणाला आवडत नाही? पण पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांना वांग्याची भाजी अजिबात गोड लागत नसणार... कारण बीटी वांग्याने त्यांना दिलेला त्रास. वांग्याच्या भाजीबरोबर हे व्यंगचित्र देखिल एन्जोय करा...