Friday, September 4, 2009

वाय एस आर - श्रद्धांजली

आन्ध्र प्रदेश च्या राजकारणात आपला वेगळा ठसा उमटवणारे मॉस लीडर वाय एस राजशेखर रेड्डी याना भावपूर्ण श्रद्धांजली. गोर गरीबंमधील त्यांची लोकप्रियता त्यानी राबविलेल्या लोकाभिमुख योजनामुळे अत्युच्चा शिखरावर पोचली होती . त्यांच्या जाण्याने झालेली पोकळी कदापि भरून येणार नाही . इश्वर त्यांच्या मृतात्म्यास शांती देवो

Friday, August 28, 2009

भाजप च्या सद्यस्थिती वर व्यंगचित्र

भारतीय जनता पार्टी मधे जे सध्या अन्तर्गत वाद विवाद चालू आहेत या मधून काय निष्पन्न होईल माहीत नाही पण भाजपची सध्याची परिस्थिति रेखाटन्याचा केलेला हा प्रयत्न किती यशस्वी झाला ते मात्र तुम्ही जरुर सांगू शकाल
प्रतिक्रिया द्यायला विसरु नका

Monday, July 13, 2009

गुजरात , विषारी दारू आणि मल्ल्या

गुजरातेत विषारी दारूच्या सेवानाने शेकडो लोकांचे बळी गेले ...
भ्रष्टाचार आणि कमकूवत प्रशासन ....
आणि त्यामधेही 'धंदा' बघणारे बिझनेसमन... यावर एक व्यंगचित्र

Friday, July 3, 2009

माया नगरी

मायावतीनी स्वताचे आणि कांशीराम यांचे पुतळे उभे करून जनतेच्या कल्याणासाठी असलेल्या पैशाची उधळपट्टी लावली आहे .मायावातींच्या याच "पुतळा " संस्कृति वर कार्टून


Friday, April 17, 2009

रिसेशन ची चिंता आहे कुणाला ?

जागतिक मंदी, ले ऑफ़ या सगळ्यांचा फरक पडतो कुणाला ? तुमच्या आमच्या सारख्या सामान्य माणसांना. या मंदीचे आजमितीस किती बळी झालेत कुणास ठावूक आणि पुढे काय वाढून ठेवले ते देखिल माहित नाही .या प्रश्नाने त्रस्त असलेल्या सगळ्या मित्रांना या व्यंगचित्राने हास्याचे दोन क्षण दिले तरी माझा प्रयत्न सार्थकी लागेल ...

Tuesday, April 14, 2009

शेर ऐ पंजाब ... व्यंगचित्र

भाजपच्या गोटातून होत असलेल्या "दुबळया" टीकेला अखेर मनमोहन सिंगनी उत्तर दिले. अगदी मार्मिक पणे इतिहासातील दाखले देत कोण दुबळे आहे ते सांगितले. याच विषयावर आम्ही थोड़े ब्रश स्ट्रोक्स चे सुख घेतले आणि हे कार्टून जन्माला आले ....

Friday, April 10, 2009

भावी पंतप्रधान कोण ? केरीकेचर्स

या लोकसभेत कुणाला बहुमत मिळणार या बाबत कितीही वाद असले तरी सर्वानी आपले पंतप्रधान पदाचे उमेदवार आधीच ठरवून टाकलेत .काही जण गुडघ्याला बाशिंग बांधून देखिल बसलेत .भविष्यात या राजकारणाला जो रंग यायचा तो येवू देत पण याच विषयाशी सम्बंधित काही राजकीय नेत्यांची केरीकेचर्स कशी जमलीत ते बघा ...