
Sunday, January 3, 2010
३ पेक्षा जास्त इडियट्स
आजकाल बॉलीवुड मधे नवीन चित्रपट हिट होण्याच्या मार्गावर असेल तर त्याबद्दल बरीच प्रकरणे बाहेर येणे नवीन नाही ( पब्लिसिटी स्टंट ). "३ इडियट्स" आणि चेतन भगत यांची कादंबरी "५ पॉइंट समवन" याच्या बाबतीत देखिल सध्या हेच चालू आहे. श्रेय लाटण्यावरून सुरु झालेली सुन्दोपसुन्दी सगळयानी पाहिली आहे. यावर एक व्यंगचित्र

Wednesday, December 30, 2009
TwitTharoor पुन्हा गाजते आहे
शशी थरूर पुन्हा त्यांच्या Twits मुळे पुन्हा प्रकाशझोतात आले आहेत. त्यांचेच वरिष्ठ सहकारी एस एम् कृष्णा यानी त्यांच्यावर उघड उघड टीका केली आहे. चार भिंतीच्या आतले मुद्दे असे पब्लिक करू नयेत असे त्यांना वाटते. यावर हे व्यंगचित्र ...
Friday, November 20, 2009
मंडळ आभारी आहे

हा ब्लॉग स्टार माझा च्या ब्लॉग माझा स्पर्धेत उल्लेखनीय म्हणून गणला गेला. श्री. अच्युत गोडबोले यांच्या सारख्या व्यासंगी व्यक्तीने ही निवड करावी हे माझे भाग्यच. आपल्या प्रतिक्रिया सूचना आणि प्रेम या शिवाय हे शक्यच नाही. ज्यानी माझ्या चुका मला दाखवून दिल्या त्यांचे विशेष आभार. एक हक्काचे व्यासपीठ दिल्याबद्दल मराठी ब्लॉग नेटवर्क या संकेत स्थळाचे विशेष आभार
या विषयीचे सविस्तार वृत्त इथे पाहू शकाल -
http://www.starmajha.com/MajhaBlog.aspx?BlogID=१४३९
स्टार माझा चे आयोजक आणि परीक्षकांचे शतश: आभार आणि विजेत्यांचे हार्दीक अभिनन्दन .
- मीनानाथ धसके
Sunday, October 18, 2009
दीपावली च्या जागतिक शुभेच्छा
मित्रानो, 'सकाळ' ने दिवाळी अंकासाठी 'जागतिकीकरण ' या विषयावर व्यंगचित्रे मागविली होती. मी देखिल दोन व्यंगचित्र हौशीने काढली. पण ती वेळेत पाठवने जमले नाही .तीच व्यंगचित्रे आपनासाठी दीपावली च्या शुभेच्छा सह सादर करत आहे. लोभ असावा .


Saturday, October 10, 2009
ओबामांचे नोबेल
अमेरिकेचे अध्यक्ष्य झाल्यापासून ओबामा जे सुसाट सुटलेत ते थाम्बायलाच तयार नाहीत अवघ्या ९ महिन्यात त्यानी शंतातेसाठीचे नोबेल पटकावले सुद्धा
मित्रानो अंतर्राष्ट्रीय विषयावरचे हे माझे पहिलेच व्यंगचित्र कसे जमले आहे जरुर सांगा
मित्रानो अंतर्राष्ट्रीय विषयावरचे हे माझे पहिलेच व्यंगचित्र कसे जमले आहे जरुर सांगा
Tuesday, October 6, 2009
सलमान खुर्शिदांचा सल्ला - व्यंगचित्र
नुकताच कॉर्पोरेट अफेयर्स मंत्री सलमान खुर्शीद यांनी संचालकांच्या आणि सी ई ओंच्या पगार संबंधी सल्ला दिला. स्विस बँकेत असणारा काळा पैसा, भ्रष्टाचाराने बरबटलेल्या राजकारान्यांची वाढती गडगंज संपत्ति, निवडनुकीच्या तोंडावर दिलेली भरघोस पगार वाढ या विषयावर पण खुर्शीद साहेबानी भाष्य केले तर देशाचा जास्त फायदा होईल ...

Saturday, September 19, 2009
'गुराढोरांचा डबा' , "Holy Cow" आणि शशी थरूर
परराष्ट्र राज्यमंत्री शशी थरूर यानी विमान प्रवासातील इकॉनॉमी क्लासला 'गुराढोरांचा डबा' असे संबोधित केल्यामुले त्यांच्यावर टीकेची झोड उठली . मुळाताच वादाला सुरवात त्यांच्या "I would travel cattle class out of solidarity with all our holy cows!" या ट्विटर मधील स्टेटमेंट ने झाली . आपल्या पन्तप्रधानानी हां जोक असल्याचे सांगितले .आणि Holy Cow म्हणजे भाजप चा आपुलकीचा प्रश्न .
या सगल्या मधे गम्मत शोधण्याचा केलेला हा प्रयत्न .
या सगल्या मधे गम्मत शोधण्याचा केलेला हा प्रयत्न .
Subscribe to:
Posts (Atom)
