Tuesday, April 7, 2009
बूट...
Thursday, April 2, 2009
Sunday, January 11, 2009
पांढर पेशे चोर
Saturday, January 10, 2009
सत्यम सारखे घोटाळे होवू नयेत असे वाटते ?
मंदीच्या चटक्या मधे आधीच भाजून निघत असलेल्या आय टी मधील कर्मचार्याना सत्यम च्या रामलिंग राजूनी अजून खडयात ढकलले आहे. आर्थिक घोटाळया पेक्ष्या ही हे मोठे पाप आहे. स्वताच्या तुंबडया भरण्यासाठी हजारो कर्मचार्यांचा बळी देने योग्य नाही. राजूंच्या राजकीय संबंधां बद्दल आणि त्यांच्या 'लैंड बैंक ' बद्दल ऐकीवात आले, म्हणजेच हे शिस्तबद्ध रीत्या झाले आहे .
उद्योगपती कुटुंबियांचे वर्चस्व असलेल्या कम्पन्यां कड़े दुर्बिनितून बघायची वेळ आली आहे, नाहीतर सामान्यांचे असेच बळी जातील .
माझ्या उद्योगविषयक ब्लॉग मधे मी या विषयावर एक कार्टून प्रसिद्ध केले आहे .खालील लिंक वर ते तुम्ही बघू शकता -http://corptoons.blogspot.com/2009/01/satyam-should-be-avoided-in-future.html
Monday, December 29, 2008
लोभ असावा
पाच सहा महीने झाले ब्लॉग्गिंग च्या विश्वात आलो आणि या विश्वाची व्याप्ति पाहून थक्क झालो .माझ्या व्यंगचित्रांना तथाकथित मिडिया मधे शोधून शोधून थकलो असतो तरी एखादा कोपरा देखिल मिळाला नसता, पण आज ती माझ्या ब्लॉग वर दिमाखात मिरवत आहेत .आणि आपल्या सारख्या असंख्य इ-वाचकांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. अल्पावधीतच माझ्या ब्लॉग ला उदंड प्रतिसाद लाभला. "मराठी ब्लॉग विश्व" चे विशेष आभार. वर्षाच्या शेवटी मागे पहाताना काहीतरी चांगले नवीन वर्षात देता यावे यासाठी हुरूप आलाय .
वर्ष खूपच क्लेशदायक होतं ! कुठलाही संवेदनशील माणूस आज सेलिब्रेशन च्या मूड मधे नाही. बाकी ज्याना "बहाणा" लागतो त्यांच्या साठी आणखी एक ईयर एंड .
आपल्या वरचे दहशतवादाचे आणि आर्थिक संकट लवकरात लवकर टळो हीच इश्वर चरनी प्रार्थना ! Happy New Year...
लोभ असावा
आपला,
मीनानाथ धसके
Wednesday, December 24, 2008
यांना कुणीतरी थांबवा !
अन्तुलेंनी आता कोलांटी उडी मारली आहे पण त्यांच्या वक्तव्याने जी मने दुखावली गेली आहेत त्याचे काय ? आधीच हताश झालेल्या पोलीस दलाच्या मानसिकतेचे काय ? देशाच्या सुरक्षा व्यवस्थे बद्दल असलेल्या लोकप्रतिनिधिंच्या संकल्पनांचे काय ? किती दिवस आपण हे "चलता है " म्हणत पुढे जाणार ?
Monday, December 22, 2008
आता पाकला धडा शिकवलाच पाहिजे ....
अमेरिकेवर जेंव्हा हल्ला झाला तेंव्हा त्यानी कुणाला विचारले ? तालीबान राजवट नष्ट करुन टाकली. आता भारतानेच पुढाकार घेवून हा प्रश्न सोडवला पाहिजे कारण सगळ्यात जास्त नुकसान भारताचे होत आहे. प्रत्येक भारतीयाला यापेक्ष्य दुसरे काही या घडीला तरी सूचने शक्य नाही. हे संकट आर्थिक संकटा पेक्ष्या मोठे आहे तेंव्हा एकदाचा प्रश्न सोडवून टाकूया .