मित्रहो,
झेंडा चित्रपटसंबंधी एक व्यंगचित्र आम्ही १० जानेवारी २०१० ला आमच्या ब्लॉग वर प्रसिद्ध केले होते.
ही त्याची लिंक http://minanath.blogspot.com/2010/01/blog-post_10.html
आम्ही वृत्तपत्रे चाळत असताना आमच्या हाती लोकसत्ता चे ११ जानेवारी २०१० चे याच सम्बंधाताले व्यंगचित्र लागले .
खालील लिंक वर ११ जानेवारी २०१० चे व्यंगचित्र पहा -
http://www.loksatta.com/index.php?option=com_phocagallery&view=category&id=33:2009-12-31-11-54-56&Itemid=83
Wednesday, January 13, 2010
Tuesday, January 12, 2010
भारतीया वरील हल्ले
आँस्ट्रेलीया मधे भारतीयावारील हल्ले दीवसेंदीवस वाढतच आहेत हे हल्ले वंशवादाने प्रेरीत आहेत की त्यांची कायदा व्यवस्था एवढी ढासळली आहे या पेक्ष्या तेथील भारतीया मधील भय दूर करने जास्त महत्वाचे आहे। आज ते ज्या दडपनाखाली जगत आहेत ते दुर्लक्षीत करून चालणार नाही यावर भाष्य करणारे हे एक कार्टून


Monday, January 11, 2010
Aal izz Well
'थ्री पॉइंट समवन' आणि ' ३ इडियट्स' चा वादावर जरी पडदा पडला असला तरी त्याचा खरा फायदा चेतन भगत ला झालेला दिसतो. या वादाच्या दरम्यान त्याच्या या पुस्तकाचा खप वाढला आणि ते आउट ऑफ़ स्टॉक झाले होते. खरे इडियट्स कोण आहेत ते आता तुम्हीच ठरवा.
पहा यावर एक छान व्यंगचित्र http://caricaturehome.blogspot.com/2010/01/aal-izz-well.html
पहा यावर एक छान व्यंगचित्र http://caricaturehome.blogspot.com/2010/01/aal-izz-well.html
Sunday, January 10, 2010
झेंडा ला राजकीय कात्री
आजकाल मराठी चित्रपटांना आणखी एक नवीन सेंसाॅरचालू झाला आहे - "पॉलिटिकल सेंसाॅर ". झेंडा चा वाद मिटायच्या आधीच 'शिक्षणाच्या आयचा घो' चा वाद सुरु झाला . काही दिवसानी राजकारण्याना विचारूनच चित्रपट निर्मिती करण्याची वेळ येवू नए म्हणजे झाले. अभिव्यक्ति स्वातंत्र्या वरील या राजकीय आक्रमणाचा आपण निषेध करुया .
Sunday, January 3, 2010
३ पेक्षा जास्त इडियट्स
आजकाल बॉलीवुड मधे नवीन चित्रपट हिट होण्याच्या मार्गावर असेल तर त्याबद्दल बरीच प्रकरणे बाहेर येणे नवीन नाही ( पब्लिसिटी स्टंट ). "३ इडियट्स" आणि चेतन भगत यांची कादंबरी "५ पॉइंट समवन" याच्या बाबतीत देखिल सध्या हेच चालू आहे. श्रेय लाटण्यावरून सुरु झालेली सुन्दोपसुन्दी सगळयानी पाहिली आहे. यावर एक व्यंगचित्र

Wednesday, December 30, 2009
TwitTharoor पुन्हा गाजते आहे
शशी थरूर पुन्हा त्यांच्या Twits मुळे पुन्हा प्रकाशझोतात आले आहेत. त्यांचेच वरिष्ठ सहकारी एस एम् कृष्णा यानी त्यांच्यावर उघड उघड टीका केली आहे. चार भिंतीच्या आतले मुद्दे असे पब्लिक करू नयेत असे त्यांना वाटते. यावर हे व्यंगचित्र ...
Friday, November 20, 2009
मंडळ आभारी आहे

हा ब्लॉग स्टार माझा च्या ब्लॉग माझा स्पर्धेत उल्लेखनीय म्हणून गणला गेला. श्री. अच्युत गोडबोले यांच्या सारख्या व्यासंगी व्यक्तीने ही निवड करावी हे माझे भाग्यच. आपल्या प्रतिक्रिया सूचना आणि प्रेम या शिवाय हे शक्यच नाही. ज्यानी माझ्या चुका मला दाखवून दिल्या त्यांचे विशेष आभार. एक हक्काचे व्यासपीठ दिल्याबद्दल मराठी ब्लॉग नेटवर्क या संकेत स्थळाचे विशेष आभार
या विषयीचे सविस्तार वृत्त इथे पाहू शकाल -
http://www.starmajha.com/MajhaBlog.aspx?BlogID=१४३९
स्टार माझा चे आयोजक आणि परीक्षकांचे शतश: आभार आणि विजेत्यांचे हार्दीक अभिनन्दन .
- मीनानाथ धसके
Subscribe to:
Posts (Atom)