Friday, April 17, 2009
रिसेशन ची चिंता आहे कुणाला ?
जागतिक मंदी, ले ऑफ़ या सगळ्यांचा फरक पडतो कुणाला ? तुमच्या आमच्या सारख्या सामान्य माणसांना. या मंदीचे आजमितीस किती बळी झालेत कुणास ठावूक आणि पुढे काय वाढून ठेवले ते देखिल माहित नाही .या प्रश्नाने त्रस्त असलेल्या सगळ्या मित्रांना या व्यंगचित्राने हास्याचे दोन क्षण दिले तरी माझा प्रयत्न सार्थकी लागेल ...
Tuesday, April 14, 2009
शेर ऐ पंजाब ... व्यंगचित्र
भाजपच्या गोटातून होत असलेल्या "दुबळया" टीकेला अखेर मनमोहन सिंगनी उत्तर दिले. अगदी मार्मिक पणे इतिहासातील दाखले देत कोण दुबळे आहे ते सांगितले. याच विषयावर आम्ही थोड़े ब्रश स्ट्रोक्स चे सुख घेतले आणि हे कार्टून जन्माला आले ....


Friday, April 10, 2009
भावी पंतप्रधान कोण ? केरीकेचर्स
या लोकसभेत कुणाला बहुमत मिळणार या बाबत कितीही वाद असले तरी सर्वानी आपले पंतप्रधान पदाचे उमेदवार आधीच ठरवून टाकलेत .काही जण गुडघ्याला बाशिंग बांधून देखिल बसलेत .भविष्यात या राजकारणाला जो रंग यायचा तो येवू देत पण याच विषयाशी सम्बंधित काही राजकीय नेत्यांची केरीकेचर्स कशी जमलीत ते बघा ...


Tuesday, April 7, 2009
बूट...
पायातल्या चपला कधी डोक्यावर घेवू नये म्हणतात पण पयातल्याच बुटानाच एवढे महत्व येईल असे कधीच वाटले नव्हते . अगदी जॉर्ज बुश पासून आपल्या स्टार पर्फ़ोर्मर चिदंबरम यांच्या पर्यंत सगळ्याना याचा प्रसाद खावा लागला .यावरच विषयावरच हे कार्टून ......

Thursday, April 2, 2009
Subscribe to:
Posts (Atom)