Friday, November 28, 2008

एक तारा गमावला - हेमंत करकरेना श्रद्धांजली

मुंबई वरील भ्याड दहशतवादी हल्ल्याचा आम्ही निषेध करतो.
भारतातील सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेले कर्तव्यनिष्ठ अधिकारी, दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरेना भावपूर्ण श्रद्धांजली ।

या हल्ल्यात शहीद झालेल्या अशोक कामते, विजय सालसकर व सर्व जवानना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या मृतात्म्यास शान्ति लाभों हीच इश्वर चरनी प्रार्थना .

Salute to Hemant Karkare, Ashok Kamate, Vijay Salaskar & All others.

Tuesday, November 25, 2008

रिसेशन चे हसेशन


रिसेशन च्या बातम्या वाचून बोर झाला असल तर तर थोड़े इकडे बघा. लहानंपासून मोठ्यापर्यंत गरीबा पासून श्रीमंतापर्यंत .... अगदी लग्नाच्या बाजारा पर्यंत रिसेशन ने कसा स्कोर केलाय तो बघा .....
आजकालची मुले भारीच स्मार्ट ... मग त्यांची चोइस कशी चुकेल ?

गड्या आपुला गाव बरा .... भुकेला कोंडा आणि निजेला धोंडा .... थोडक्यात काय तर मज्जानु लाइफ .... कशाला पाहिजे ती लट्ठा पगाराची नोकरी आणि आलिशान लाइफ ?


These cartoons are based on the present global economic meldown and recession due to it. Recession is been discussed everywhere. These cartoons include few angles of looking at it. First cartoon talks about the matrimony , how recession has changed the viewpoint of parents about their to be son-inlaw. Secon cartoon talks about again career shift due to changed scenarios how kids pick up something from what is going on around them. And last but not least talks about the instability in the job market and gives age over evergreen business.

Saturday, November 22, 2008

जागतिक मंदी पासून गरिबांना वाचवा

नुकतीच कीमती कमी करण्याची अर्थमंत्र्यांची विनंती कॉरपोरेट जगाताने धुडकावून लावली. या पार्श्वभूमीवर सोनिया गांधीनी नुकतेच जाहीर केले की जागतिक मंदी पासून गरिबांना वाचवा.अमेरिकेत आतापर्यंत लट्ठ नफा कमावालेल्या कम्पन्याना वाचवान्याचे प्रकार चालले आहेत. सेंसेक्स आणि कॉरपोरेट जगताभोवती फिरनार्या अर्थव्यवस्थेचे समाजातील दुबल्या वर्गाकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. या व्यंगाचित्राची प्रेरणा यामधेच आहे. हे संकट लवकर दूर होवो हीच प्रार्थना .

कार्टून आवडले तर प्रतिक्रिया द्यायला विसरु नका.

Friday, November 21, 2008

भारनियामानाचे फायदे

भारनियामानाचे फायदे ? त्रस्त झालेल्या महाराष्ट्रातील तमाम जनतेला आश्चर्य वाटेल ना ? महाराष्ट्राच्या पाचवीला जरी पुजलेले असले तरी काही लोकाना भारनियामानाचा फायदा झाला आहे तो असा.


प्राइम टाइम मधील भारनियमन सासु सुनेच्या सेरिअल्स जरी चुकवत असले तरी महिला वर्गाची अशी सोय मात्र झालीय

आणि सगळ्यात शेवटी ..... लग्नाचा हंगाम सुरु झाला असताना हा फायदा कुणीच नाकारु शकत नाही.

Sunday, November 16, 2008

तुमचा बॉस बेंच वर आहे का ?

मित्रानो सध्या आर्थिक मंदी .... काम नाही ... मग त्याला बॉस देखिल अपवाद कसा असणार ?
तुमचा बॉस बेंच वर आहे का ? नाही ? मग असे समाज की तो बेंच वर आहे आणि हे कार्टून पाहून खुदुखुदू हसा ! तेवढेच समाधान .
आणि जर खरच बॉस बेंच वर असेल ..... तर खो खो हसा हे कार्टून पाहून...

आणि हो..... आपल्या Reactions द्यायला विसरु नका

Thursday, November 13, 2008

आर्थिक निरर्थक संकट


जागतिक आर्थिक मंदी ,चलन वाढ , दिवसेंदिवस नीचांक गाठनारा शेअर बाजार, महागाई, बेरोजगारी..... अशा रोजच्या किरकिरिला वैतागलेल्या मित्रांसाठी याच विषयावरची कार्टून्स .....


राजकारणी कुठल्या विषयाचा वापर करतील याचा नेम नाही.
आणि आपली गरीब जनता ....काही लोकाना निमित्त मिळाले ....

Tuesday, November 11, 2008

चांदोमामा जवळ चांद्रयान

आपले मानव विरहित चांद्रयान चंद्राच्या कुशीत पोचले ।सर्व भारतीयांची मान उन्चावनारा हा क्षण .मर्यादित देशांच्या 'मून क्लब' मधे भारत जावून बसलाय. भारताच्या या पुढील चंद्र मोहिमामधे आता हुरूप येईल . विशेष म्हणजे या यानाचे सगळे कार्यक्रम नियोजित वेळेत पूर्ण होत आहेत आणि इस्रो च्या शास्त्रज्ञांचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे . आता "भारतीयाना वेळेची किंमत नाही" आणि "ब्रेन ड्रेन " या बद्दल बोलनारांची तोंडे बंद होतील ना ? मी बोअर करतोय का ? मग या चन्द्रयानाचा उद्देश संशोधन हा असला तरी या जोडप्याला काय चिंता लागलेली आहे पहा

Friday, November 7, 2008

मॉल संस्कृती - एक गम्मत

बघता बघता इंग्लंड अमेरिके पर्यंत मर्यादित असणारी मॉल संस्कृती भारतात आली देखील .आता हे आपल्यासाठी चांगले की वाईट याचा जास्त विचार करण्या पेक्ष्या मॉल संस्कृतीच केलेला हा पंचनामा पहाणे जास्त सोपे आहे . तर मित्रानो मॉल संस्कृती म्हणजे काय ते पहा .