Monday, January 11, 2010

Aal izz Well

'थ्री पॉइंट समवन' आणि ' ३ इडियट्स' चा वादावर जरी पडदा पडला असला तरी त्याचा खरा फायदा चेतन भगत ला झालेला दिसतो. या वादाच्या दरम्यान त्याच्या या पुस्तकाचा खप वाढला आणि ते आउट ऑफ़ स्टॉक झाले होते. खरे इडियट्स कोण आहेत ते आता तुम्हीच ठरवा.
पहा यावर एक छान व्यंगचित्र http://caricaturehome.blogspot.com/2010/01/aal-izz-well.html

Sunday, January 10, 2010

झेंडा ला राजकीय कात्री

आजकाल मराठी चित्रपटांना आणखी एक नवीन सेंसाॅरचालू झाला आहे - "पॉलिटिकल सेंसाॅर ". झेंडा चा वाद मिटायच्या आधीच 'शिक्षणाच्या आयचा घो' चा वाद सुरु झाला . काही दिवसानी राजकारण्याना विचारूनच चित्रपट निर्मिती करण्याची वेळ येवू नए म्हणजे झाले. अभिव्यक्ति स्वातंत्र्या वरील या राजकीय आक्रमणाचा आपण निषेध करुया .

Sunday, January 3, 2010

३ पेक्षा जास्त इडियट्स

आजकाल बॉलीवुड मधे नवीन चित्रपट हिट होण्याच्या मार्गावर असेल तर त्याबद्दल बरीच प्रकरणे बाहेर येणे नवीन नाही ( पब्लिसिटी स्टंट ). " इडियट्स" आणि चेतन भगत यांची कादंबरी " पॉइंट समवन" याच्या बाबतीत देखिल सध्या हेच चालू आहे. श्रेय लाटण्यावरून सुरु झालेली सुन्दोपसुन्दी सगळयानी पाहिली आहे. यावर एक व्यंगचित्र

Wednesday, December 30, 2009

TwitTharoor पुन्हा गाजते आहे

शशी थरूर पुन्हा त्यांच्या Twits मुळे पुन्हा प्रकाशझोतात आले आहेत. त्यांचेच वरिष्ठ सहकारी एस एम् कृष्णा यानी त्यांच्यावर उघड उघड टीका केली आहे. चार भिंतीच्या आतले मुद्दे असे पब्लिक करू नयेत असे त्यांना वाटते. यावर हे व्यंगचित्र ...

Friday, November 20, 2009

मंडळ आभारी आहे


हा ब्लॉग स्टार माझा च्या ब्लॉग माझा स्पर्धेत उल्लेखनीय म्हणून गणला गेला. श्री. अच्युत गोडबोले यांच्या सारख्या व्यासंगी व्यक्तीने ही निवड करावी हे माझे भाग्यच. आपल्या प्रतिक्रिया सूचना आणि प्रेम या शिवाय हे शक्यच नाही. ज्यानी माझ्या चुका मला दाखवून दिल्या त्यांचे विशेष आभार. एक हक्काचे व्यासपीठ दिल्याबद्दल मराठी ब्लॉग नेटवर्क या संकेत स्थळाचे विशेष आभार






या विषयीचे सविस्तार वृत्त इथे पाहू शकाल -
http://www.starmajha.com/MajhaBlog.aspx?BlogID=१४३९

स्टार माझा चे आयोजक आणि परीक्षकांचे शतश: आभार आणि विजेत्यांचे हार्दीक अभिनन्दन .

- मीनानाथ धसके

Sunday, October 18, 2009

दीपावली च्या जागतिक शुभेच्छा

मित्रानो, 'सकाळ' ने दिवाळी अंकासाठी 'जागतिकीकरण ' या विषयावर व्यंगचित्रे मागविली होती. मी देखिल दोन व्यंगचित्र हौशीने काढली. पण ती वेळेत पाठवने जमले नाही .तीच व्यंगचित्रे आपनासाठी दीपावली च्या शुभेच्छा सह सादर करत आहे. लोभ असावा .

Saturday, October 10, 2009

ओबामांचे नोबेल

अमेरिकेचे अध्यक्ष्य झाल्यापासून ओबामा जे सुसाट सुटलेत ते थाम्बायलाच तयार नाहीत अवघ्या ९ महिन्यात त्यानी शंतातेसाठीचे नोबेल पटकावले सुद्धा
मित्रानो अंतर्राष्ट्रीय विषयावरचे हे माझे पहिलेच व्यंगचित्र कसे जमले आहे जरुर सांगा