Sunday, August 8, 2010

कॉमन वेल्थ ****

दीड दोन वर्षापूर्वी मी एक वाघाचे व्यंगचित्र काढले होते. ते एवढे प्रसिद्ध झाले की मलाच एकदा ते फ़ॉरवर्डेड मेल मधे आले. राष्ट्रकूल स्पर्धेचा खिन्न "शेरा" बघितला आणि मला त्या वाघाची आठवण झाली. मग हे व्यंगचित्र सुचले. या भ्रष्ट्राचाराबद्दल एवढ्या लोकांनी एवढे बोलून झाले आहे की न बोलता सरळ ब्रश हाती घेतलेला बरा.

 

Friday, July 9, 2010

खळ निंदका मनीहि सत्य न्याय वसू दे ।

भाजपच्या गडकरींनी यादवांची खिल्ली उडवून आधीच त्यांच्या अशा टीका प्रकारावर नाराजी ओढवून घेतली होती. आता ते परत बरसले. या वेळेला त्यानी अफ़झल गुरु ला कॉंग्रेस चा जावईच बनवून टाकले. त्यांची त्यामगची भावना समजून घेतील तर ते राजकारणी कसले? असो. मूक प्राण्यांना यावेळी घाणेरड्या राजकारणात ओढले नाही हा मुद्दा महत्वाचा आणि त्यावरच हे व्यंगचित्र.

Wednesday, June 16, 2010

दोन देश....

एका देशामधे  मेक्सिको आखातातील ’बीपी’ ची तेलगळती एवढ्या गांभिर्याने घेतली जाते... तर दुसरीकडे एका देशात हजारो बळी घेणार्या भोपाळ वायू गळती दुर्घटनेच्या बाबतीत अनेक वर्षे सरकार दिशाहीन आहे.  ओबामांनी बीपीला धारेवर धरले आहे. आणि इथे अ‍ॅंडरसन ला मोकट सोडून दिले.

Sunday, March 28, 2010

बिग बी, बिगर पॉलिटिक्स, बिग्गेस्ट प्रॉब्लेम्स...

अमिताभ बच्चन यांच्या एका कार्यक्रमातील उपस्थितीने एवढी प्रश्नचिन्हे ? एवढी की कॉंग्रेसजन आजकाल सगळ्या "बच्चन" कुटुंबीयांना चक्क टाळू लागलेत ? पुण्याच्या सहित्य संमेलना ला आधीच उपस्थिती लावून मुख्यमंत्र्यांनी देखिल बिग बी ला खो दिला.


Thursday, March 25, 2010

चीन मधे गूगलींग ला घरघर.....!!

चीन मधे "गूगल" ने सेन्सॉरशिप चे जोखड झुगारून सर्च इंजिन हॉंन्गकॉन्ग ला जोडले. पण यामुळे चीन मधिल  लोकांना काही फायदा होण्याऐवजी गूगल च्या भवितव्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गूगल चे चीन सारख्या मोठ्या इंटरनेट कम्युनिटीला "बाय बाय" करण्यामागे निश्चितच काहीतरी कारण असेल. असो. हे व्यंगचित्र पहा त्यावरच.

Sunday, March 21, 2010

"माला"वतींची "माया" आणि फ़सलेल्या मधमाशा

मायावतींच्या नोटांच्या हाराने गाजलेल्या सभेत मधमश्यांचा हल्ला झाला त्याचे खापर अपेक्षेप्रमाणे मायावतींनी विरोधकांवर फ़ोडले. मधमाश्या आल्या आणि काही वेळाने कुणालाही इजा न करता गेल्या देखिल. मधमाश्या कशा आल्या याची उच्चस्तरीय पोलिस चौकशी चालू आहे. पण त्या काहीही न करता का गेल्या हे माहिती आहे का ?

Tuesday, March 9, 2010

उदो उदो

अखेर राज्यसभेत महिला आरक्षण विधेयक मंजूर झालं ! दलित आणि मुस्लीम कल्याणाच्या बुरख्याआड लपलेल्या पुरुष प्रधान "यादवां"ना इतर सर्व पक्षांनी हिसका दाखवला. याचे श्रेय सोनिया गांधींचे की सर्वांचे याचा विचार करण्यापेक्षा स्त्री शक्तीच्या या विजयाचे आणि पुरोगामी भारतीयांचे अभिनंदन करायला हवे. यावर हे भाष्य -