काश्मिर मधली जाळ्पोळ थांबायचे नाव घेत नाही आणि पाकिस्तान ला त्यामधे आपली पोळी भाजून घ्यायची आहे. "मानवाधिकारांचे उल्लंघन थांबवा" म्हणून पकिस्तानचे विदेशमंत्री कुरेशी यांनी सल्ला दिला. एवढी वर्षे घुसखोरी आणि आतंकवादी कारवाया होत आहेत, तेन्व्हा हे शहाणपण फ़क्त भारताला सल्ले देण्यापुरतेच मर्यादित आहे का ?
Saturday, September 18, 2010
Sunday, September 5, 2010
ब्लॉगर्स साठी....
सकाळ ने ब्लॉगर्सना कॉपीराइट मार्गदर्शन करण्यासाठी एक व्हिडिओ कॉन्फ़रन्स आयोजित केली होती. आपल्या हक्कांबद्दल जाणून घेण्यासाठी इ-सकाळ वर सविस्तर वाचा.
दुवा... http://www.esakal.com/esakal/20100904/5643604780719295296.htm
दुवा... http://www.esakal.com/esakal/20100904/5643604780719295296.htm
फोटो सौजन्य : सकाळ
Sunday, August 8, 2010
कॉमन वेल्थ ****
दीड दोन वर्षापूर्वी मी एक वाघाचे व्यंगचित्र काढले होते. ते एवढे प्रसिद्ध झाले की मलाच एकदा ते फ़ॉरवर्डेड मेल मधे आले. राष्ट्रकूल स्पर्धेचा खिन्न "शेरा" बघितला आणि मला त्या वाघाची आठवण झाली. मग हे व्यंगचित्र सुचले. या भ्रष्ट्राचाराबद्दल एवढ्या लोकांनी एवढे बोलून झाले आहे की न बोलता सरळ ब्रश हाती घेतलेला बरा.
Friday, July 9, 2010
खळ निंदका मनीहि सत्य न्याय वसू दे ।
भाजपच्या गडकरींनी यादवांची खिल्ली उडवून आधीच त्यांच्या अशा टीका प्रकारावर नाराजी ओढवून घेतली होती. आता ते परत बरसले. या वेळेला त्यानी अफ़झल गुरु ला कॉंग्रेस चा जावईच बनवून टाकले. त्यांची त्यामगची भावना समजून घेतील तर ते राजकारणी कसले? असो. मूक प्राण्यांना यावेळी घाणेरड्या राजकारणात ओढले नाही हा मुद्दा महत्वाचा आणि त्यावरच हे व्यंगचित्र.
Wednesday, June 16, 2010
दोन देश....
एका देशामधे मेक्सिको आखातातील ’बीपी’ ची तेलगळती एवढ्या गांभिर्याने घेतली जाते... तर दुसरीकडे एका देशात हजारो बळी घेणार्या भोपाळ वायू गळती दुर्घटनेच्या बाबतीत अनेक वर्षे सरकार दिशाहीन आहे. ओबामांनी बीपीला धारेवर धरले आहे. आणि इथे अॅंडरसन ला मोकट सोडून दिले.

Sunday, March 28, 2010
बिग बी, बिगर पॉलिटिक्स, बिग्गेस्ट प्रॉब्लेम्स...
अमिताभ बच्चन यांच्या एका कार्यक्रमातील उपस्थितीने एवढी प्रश्नचिन्हे ? एवढी की कॉंग्रेसजन आजकाल सगळ्या "बच्चन" कुटुंबीयांना चक्क टाळू लागलेत ? पुण्याच्या सहित्य संमेलना ला आधीच उपस्थिती लावून मुख्यमंत्र्यांनी देखिल बिग बी ला खो दिला.

Thursday, March 25, 2010
चीन मधे गूगलींग ला घरघर.....!!
चीन मधे "गूगल" ने सेन्सॉरशिप चे जोखड झुगारून सर्च इंजिन हॉंन्गकॉन्ग ला जोडले. पण यामुळे चीन मधिल लोकांना काही फायदा होण्याऐवजी गूगल च्या भवितव्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गूगल चे चीन सारख्या मोठ्या इंटरनेट कम्युनिटीला "बाय बाय" करण्यामागे निश्चितच काहीतरी कारण असेल. असो. हे व्यंगचित्र पहा त्यावरच.


Subscribe to:
Posts (Atom)